Shivsena Rahul Shewale News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News : '...तरच ठाकरे गटाच्या नेत्यांना शिवसेना कार्यालयात प्रवेश', राहुल शेवळेंचा मोठा निर्णय

विनायक राऊत यांच्यासह लोकसभेतील पाच खासदारांबाबत घेतला जाणार हा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Rahul Shewale News: शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाकडे आलं आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती दिली आहे.

विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदेंच्या ताब्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करत शिंदे शिवसेनेला कार्यालय देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने आता आपला मोर्चा शिवसेना कार्यालयाकडे वळवला आहे.

यानुसार आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार शिवसेना कार्यालयात प्रवेश केला.

संसदेच्या भवनात शिवसेना पक्षाला जे कार्यालय मिळाले आहे. ते शिंदे गटाकडे देण्यात यावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यांची ही मागणी लगेच मान्य करण्यात आली आहे. आता संसदेतील कार्यालय हे शिंदे गटाला मिळाले आहे.

त्यामुळे या कार्यालयात संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांना प्रवेश मिळण्याची आता शक्यता नाहीये.

जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे तिन्ही नेते मानत असतील तर त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल अशी भूमिका संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. हाच निर्णय विनायक राऊत यांच्यासह लोकसभेतील पाच खासदारांबाबत घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT