ED Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटातल्या 'या' नेत्यांची ईडीपासून सुटका? पाहा यादी

ईडीच्या भीतीमुळे नेत्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटाचा हात धरल्याचा आरोप होत आहे.

दत्ता लवांडे

काल शिवसेनचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आणि पुन्हा एकदा भाजपकडून सत्तेसाठी ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोपाला तोंड फुटलं. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही चोहोबाजूंनी होत आहे. त्याचबरोबर शिवसेनेतील नेते ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपकडे गेल्याचा आरोप आता बळावत आहे. पण शिंदे गटात गेलेल्या अशा नेत्यांच्या ईडी चौकशीतून मुक्तता होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मागचा इतिहास बघता, भाजपात गेलेल्या एकाही नेत्यावर ईडीकडून पुन्हा मोठी कारवाई करण्यात आल्याचं पहायला मिळालं नाही. मरण आलं तरी शरण जाणार नाही असं म्हणत संजय राऊत ईडीच्या कारवाईला समोर गेले खरे पण ईडीची कारवाई चालू असलेल्या आणि शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना ईडीपासून अभय मिळणार का? याकडे आता लक्ष लागलेले आहे. ईडीची कारवाई चालू असताना शिंदे गटात गेलेल्या नेत्यांची यादी खालीलप्रमाणे.

१) प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक यांच्यावर NSELमध्ये २५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीकडून त्यांच्या ठाणे आणि मुंबईतील घरावर छापेमारी झाली होती. जून २०२१ मध्ये त्यांनी भाजपमध्ये जाण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर आता ते शिंदे गटात आहेत.

२) भावना गवळी

भावना गवळी या यवतमाळच्या खासदार असून त्यांच्या पाच संस्थेवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्याचबरोबर भाजपने त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या आता शिंदे गटात दाखल झाल्या आहेत.

३) यामिनी जाधव आणि यशवंत जाधव

जाधव दाम्पत्याने हवालाच्या माध्यमातून युएई येथील दोन कंपन्यामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर आयकर विभागाकडून त्यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये भायखळ्यातील ३१ तर वांद्रा येथील पाच फ्लॅटचा सामावेश आहे. पण आता हे दोघेही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत.

४) अर्जुन खोतकर

जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणात त्यांच्यावर आरोप असून १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर ईडीने छापेमारी करत त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर ते आता शिंदे गटात दाखल झाले आहेत.

५) आनंदराव अडसूळ

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांवरही घोटाळ्याचे आरोप आहेत. सिटी बँकेच्या माध्यमातून मराठी माणसाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सिटी बँकेच ९९ टक्के मराठी माणसांची खाती होती याच बँकेतून बिल्डरांना अवैधरित्या पैसे वाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांनीही आता शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT