Satej Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

सतेज पाटलांना रोखण्यासाठी भाजपाची रणनीती; चुरशीच्या निवडणुकीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधात तगडा उमदेवार देण्याची तयारी भाजपने केली आहे. दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा होणार असल्याने सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांचा उत्‍साहही वाढला आहे. विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर लगेचच जिल्‍हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत मिळणाऱ्या थैल्या जिल्‍हा परिषद निवडणुकीत खर्च करण्यास मिळतील, या अपेक्षेने सदस्यांचा उत्‍साह वाढला आहे. दरम्यान जिल्‍हा परिषद पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री पाटील यांच्या प्रचारासाठी दौरे सुरू झाले आहेत.

सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांचा उत्‍साहही वाढला आहे.

१० डिसेंबरला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील रिंगणात असणार आहेत. गुरुवारी (ता. ११) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्‍थितीत बैठक होणार असून यात उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी तगडा उमेदवार देण्याची घोषणा केल्याने सदस्यांमध्ये उत्‍साहाचे वातावरण आहे. महिनाभरात जिल्‍हा परिषद निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीला विधान परिषद निवडणुकीचा कसा फायदा होईल, याची चर्चा जिल्‍हा परिषद सदस्यांमध्ये सुरू आहे. जिल्‍हा परिषदेचे ६५ सदस्य विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत. यातील कोणता सदस्य कोणाला मतदान करेल इथंपासून ते एका मताची बोली किती लागेल, यावर चर्चा झडू लागली आहे.

पदाधिकारी दौऱ्यावर

पदाधिकारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. अध्यक्ष राहुल पाटील हे आज (ता. ११) तीन तालुक्यांचा दौरा करणार आहेत. करवीर पंचायत समितीचे पदाधिकारीही सदस्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपचा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर जिल्‍हा परिषदेतील राजकारणाला चांगलीच रंगत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT