Nana Patole esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: ठाकरेंना फोन लावला पण संपर्क झाला नाही...महाविकास आघाडीत बिघाडी? नाना पटोलेंची नाराजी

Nana Patole: शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीमध्ये परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीत नाराजी नाट्य निर्माण झाले आहे.

Sandip Kapde

विधानपरिषदेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाने परस्पर ४ उमेदवार जाहीर केल्याने आघाडीत नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्यामुळे अगोदर चर्चा व्हायला पाहिजे होती, अशी भावना काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

नाना पटोले म्हणाले,अजूनही वेळ गेला नाही. मुंबईत आम्ही अर्ज भरला नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून, महाविकास आघाडी म्हूणून व्हाव्यात. जागांचा निर्माण झालेला वाद संपुष्टात येईल.

उद्धव ठाकरे यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही. आमच्याकडे आज दिवसभर वेळ आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. मी मातोश्रीवर कॉल केला होता पण संपर्क झाला नाही.

अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे. गेल्यावेळी सुद्धा शिवसेना लढली होती. त्यामुळे चारही जागेवर शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी फोन उचलला नाही, असे जर सांगत असतील. तर शिवसेनेची एक सिस्टीम आहे. देसाई, राऊत, आदित्य ठाकरे आहेत. यांच्याशी जरी संपर्क साधला तर मार्ग निघेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT