Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget Session : ठाकरे गटाने थेट एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडले ; हक्कभंग प्रस्ताव सादर!

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget Session : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणी दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळलं असं विधानं केलं होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. 

दरम्यान अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. याप्रकरणी दानवे यांनी स्वत: माहिती दिली आहे. 

अंबादास दानवे म्हणाले, "परवा सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला होता. कारण गेली आठ महिने सरकार शेतकऱ्यांसाठी कुठलेही निर्णय घेत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही बहिष्कार घातला.

"ह्या गोष्टी सातत्याने होत आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं होत की बर झालं देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, तर हे देशद्रोही कोण?. हा माझा प्रश्न आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे. त्यामुळे आमच्या अधिकाराचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दिला," असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांच्यावर सत्ताधारी पक्षाने हक्कभंग आणला म्हणून आपण आज प्रस्ताव दिला का?, यावर अंबादास दानवे म्हणाले, आम्ही दोन दिवस झाले हा विषय लावून धरला आहे. मात्र हा विषय चर्चेला आला नाही. त्यामुळे पर्यायाने आम्ही हक्कभंगाची नोटिस दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Fake Currency Racket : पोलिस हवालदारानेच चहाच्या दुकानात छापल्या १ कोटींच्या बनावट नोटा; सांगली, कोल्हापूरमध्ये खळबळ

Auto Accident: ऑटो उलटल्याने महिलेचा मृत्यू; चार महिला जखमी, रेमंड बोरगाव पेट्रोल पंपजवळील घटना

Maharashtra SSC HSC Exam Fee Hike: दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; पालकांच्या खिशाला बसणार झळ

Women Entrepreneurship : शिवणकाम ते स्टार्टअप! उद्योजिका जागृतीचा फॅशन डिझायनिंग व्यवसायाचा थक्क करणारा प्रवास

Uddhav Thackeray: मी आरशात बघतो; तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा! उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर

SCROLL FOR NEXT