solapur crime

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप! आरोपी स्वत:हून हजर झाला पोलिस ठाण्यात; न्यायालयाचा निकाल ऐकताच आरोपीच्या डोळ्यात पाणी, सोलापुरातील घटना

सोलापूर शहरातील नई जिंदगी चौकाजवळील अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेलसमोर आरोपी मुस्ताक पटेल याने पूर्ववैमनस्यातून शकिल पटेलबरोबर भांडण सुरू केले. त्यावेळी शकीलने ‘हमारे बच्चों के उपर झुठे केस करते क्या’ अशी विचारणा आरोपीकडे केली. त्या रागातून मुस्ताकने कमरेचा चाकू काढला आणि शकीलच्या छातीवर, पोटावर, हातावर, पाठीवर सपासप वार करून खून केला.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील नई जिंदगी चौकाजवळील अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेलसमोर आरोपी मुस्ताक पटेल याने पूर्ववैमनस्यातून शकिल पटेलबरोबर भांडण सुरू केले. त्यावेळी शकीलने ‘हमारे बच्चों के उपर झुठे केस करते क्या’ अशी विचारणा आरोपीकडे केली. त्या रागातून मुस्ताकने कमरेचा चाकू काढला आणि शकीलच्या छातीवर, पोटावर, हातावर, पाठीवर सपासप वार करून खून केला. या गुन्ह्यात मुस्ताकला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

१२ जून २०२० रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास शकीलचा खून करून मुस्ताक चाकू रस्त्यालगतच्या गटारीजवळ टाकून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाला. तत्पूर्वी, मृत शकीलचा भाऊ अलिमोद्दिन पटेल याने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि मुस्ताकला जेरबंद केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. सरकारतर्फे एकूण १४ साक्षीदार तपासले. यात तीन नेत्र साक्षीदार होते. आरोपीतर्फे बचावासाठी तीन साक्षीदार तपासण्यात आले.

पण, परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळावरील रक्ताचे डाग व चाकू, चाकूवरील व आरोपी आणि मृताच्या कपड्यावरील रक्ताचे डाग, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय पुरावा, मृताचा शवविच्छेदन अहवाल, याबाबी आरोपीला शिक्षा होण्यात महत्त्वाच्या ठरल्या. यात आरोपीतर्फे ॲड. यू. डी. जहागीरदार यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून सुनंदा घाडगे यांनी मदत केली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद अन्‌ ११० आरोपींना जन्मठेप, दोघांना फाशी

मृताच्या अंगावर चाकूने भोसकल्याच्या ११ जखमा होत्या. सर्व पुरावे आणि सरकारी वकील डॉ. राजपूत यांचा अचूक युक्तिवाद, यामुळे मुस्ताकनेच शकिल पटेलचा खून केल्याचे सिद्ध झाले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुस्ताकला जन्मठेप व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. राजपूत यांच्या कार्यकाळातील ही ११० वी जन्मठेप ठरली असून त्यांच्या युक्तिवादामुळे दोन आरोपींना फाशीही झाली आहे.

निकाल ऐकताच आरोपीच्या डोळ्यात पाणी

पूर्ववैमनस्यातून आपल्याच नात्यातील शकीलचा खून केल्याचा पश्चात्ताप मुस्ताकच्या चेहऱ्यावर दिसत होता. शुक्रवारी (ता. २८) अंतिम सुनावणी असल्याने कोर्टात खूप गर्दी जमली होती. न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावताच मुस्ताकच्या डोळ्यात पाणी होते. त्याच्या तोंडातून शब्दही निघाले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT