Election voting SAKAL
महाराष्ट्र बातम्या

जूनमध्ये निवडणुका घ्या, यंत्रणा सज्ज असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा

ओमकार वाबळे

राज्यातील जवळपास १३ महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मुंबई, पुणे नाशिकसारख्या मोठ्या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने अद्याप निवडणुकांचं प्रकरण खोळंबलं आहे. (Maharashtra Local Body Elections 2022)

मागील अधिवेशनात राज्य सरकारने सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कायदा संमत केल्यानंतर निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. (Maharashtra Election Commission)

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यासाठी तत्काळ प्रक्रिया सुरू केल्यास मनपा निवडणुका १७ जून, नगर पालिका निवडणुका २२ जून, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ११ जुलै, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका २ जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने एक वेळापत्रकच सादर केल्यामुळे निवडणुका बाबत येत्या चार मे रोजी काय निर्णय होतो याची आता उत्सुकता आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयात ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाची पुढील सुनावणीची किंवा मुदतवाढीची विनंती मान्य करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य शासनाने ११ मार्च रोजी प्रभागरचनेचे अधिकार स्वतःकडे ठेवणारा कायदा मंजूर केला असून त्याला आव्हान देणारी याचिका औरंगाबादच्या पवन शिंदे आणि इतरांनी अडव्होकेट सुधांशू चौधरी, देवदत्त पालोदकर, आडगावकर यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचं 'साम'च्या सूत्रांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP and Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती असणार? निवडणूक आयोगाने केलं जाहीर

१०० कोटींची गुंतवणूक आणि सुनील शेट्टीचं सूत्रसंचालन; 'भारत के सुपर फाउंडर्स'चा ट्रेलर लाँच; कुठे पाहाल शो?

ZP Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर; 'या' तारखेला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

BBM6: सागर कारंडे कोण? तन्वी कोलतेने तोडले अकलेचे तारे; मग नेटकऱ्यांनीही काढलं वाभाडं; म्हणाले-, 'अरे ही बाई...'

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात अविनाश जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, उद्या सुनावणी

SCROLL FOR NEXT