Lok Sabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha 2024: लोकसभेच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय! नाना पटोलेंनी दिल्लीत घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी

मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या कोअर समिती बैठकीतील सूर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेताना मताचे विभाजन होणार नाही यावरही भर दिला जात असून,जागावाटपाचे सूत्र गुणवत्तेच्या आधारेच ठरेल, असा सूर आज प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दिसला.

गरवारे क्लब येथे आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी, देश वाचविण्याची ही लढाई असून देश, लोकशाही, संविधान वाचवणे हे आमचे काम आहे. जागा वाटपाचा निर्णय मविआच्या बैठकीत गुणवत्तेच्या आधारावर होईल.

भाजपचे सत्तेतून उच्चाटन करण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन प्रयत्न करू, हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते.

बैठकीनंतर पटोले म्हणाले की, काँग्रेसने लोकसभेच्या प्रत्येक जागेचा बारकाईने अभ्यास केला. मविआची बैठक होईल त्यावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल यावर आम्ही सर्वजण विचार करू. पुढील आठवड्यात इतर समविचारी पक्षांबरोबरही चर्चा करणार आहोत.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव दिलेला नाही जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यानंतर त्यावर चर्चा करू. मविआने एकत्र राहून निवडणुका लढवाव्यात हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

संभाव्य मतदारसंघांची माहिती दिल्लीत सादर : पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत येऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील संभाव्य लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तयारीची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT