Lok Sabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha 2024: राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघावर डोळा? २०१९ 'या' जागांवर झाली चर्चा

रुपेश नामदास

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मधे लढलेल्या २३ लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवस आढावा घेतला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका आज पार पडल्या.

आगामी लोकसभा निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून एकत्रित सामोरे जाण्याचा निर्धार तिन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २०१९ प्रमाणे सर्वच्या सर्व जागा येणार नाहीत. मात्र, पक्षाचे संघटन आणि या मतदारसंघातील नेते आणि पदाधिकारी यांच्या भूमिका या बैठकीत जाणून घेण्यात आल्या.

दरम्यान, सर्वच्या सर्व २३ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आणि संघटन असल्याचे चित्र स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने पक्षचिन्हावरील पक्षाची ताकद स्पष्ट करणे शक्य नसले तरी ग्रामपंचायत निवडणुका आणि बाजार समित्यांचे कौलावरून आढावा घेण्यात येत आहे.

आजच्या आढावा बैठकीत कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, भंडारा, गोंदिया, जळगाव व रावेर, बुलडाणा, रायगड, मावळ, बारामती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी लढत झालेल्या मतदारसंघातील सद्य:स्थिती तर भाजपशी झालेल्या लढतींचा आकडेवारीनुसार आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपात तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत या आढावा बैठकांचा आधार महत्त्वाचा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT