निवडणूक sakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेची एप्रिलमध्ये निवडणूक! ‘EVM’ची १० ऑगस्टपर्यंत तपासणी; बंगळुरूवरून आले २० इंजिनिअर; राजकीय प्रतिनिधींना उपस्थितीचे पत्र

एप्रिल २०२४मध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५००० ‘EVM’ची प्रथमस्तरीय तपासणी सुरू झाली आहे. १०ऑगस्टपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही पडताळणी होणार आहे. त्यासाठी बंगळूरवरून २० अभियंते सोलापुरात दाखल झाले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आलेल्या पाच हजार ‘ईव्हीएम’ची (इलेक्ट्रिक वोटिंग मशिन) प्रथमस्तरीय तपासणी सुरू झाली आहे. १० ऑगस्टपर्यंत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही पडताळणी होणार आहे. त्यासाठी बंगळूरवरून २० अभियंते सोलापुरात दाखल झाले आहेत. पक्षांमधील फाटाफाटीमुळे अजूनही अनेक पक्षांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित राहिलेले नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३५ लाख ९६ हजार २०६ मतदार आहेत. आता नवीन मतदार नोंदणीसाठी तीन हजार ७०० शिक्षकांची ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नवमतदार नोंदणी, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे कमी केली जात आहेत.

२० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. शाळेचे कामकाज पाहून त्यांना हे काम करायचे आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर १ जानेवारी २०२४ पासून पुन्हा याच मुद्द्यावर ‘बीएलओं’ना काम करावे लागणार आहे. तत्पूर्वी, निवडणुकीसाठी सोलापुरातील रामवाडी गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, बीयूसीयू या मशिनची तपासणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्राप्त राजकीय पक्षांच्या यादीनुसार पदाधिकाऱ्यांना देखील या तपासणीवेळी उपस्थित राहण्यासंबंधीचे पत्र उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने दिले आहे. तरीपण, अनेकजण आले नसल्याने त्यांना पुन्हा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.

१ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी

ज्या विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांनीही आता मतदार नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी तहसीलदारांच्या माध्यमातून ‘बीएलओ’ नेमले आहेत, त्यांच्याकडे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘बीएलओं’नी मुदतीत काम करायचे आहे. काहीतरी कारण देवून काम टाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ज्यांचे अत्यावश्यक कारण आहे, त्यांनाच ‘बीएलओ’तून वगळले जाते. इतरांना मात्र निवडणूक आयोगाने दिलेली कामे करावी लागतील.

लोकसभा निवडणुकीची तयारी...

  • एकूण मतदान केंद्रे

  • ३,७००

  • निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’

  • ५,०००

  • बीएलओ

  • ३,७००

  • मशिन तपासणी

  • २५ जुलै ते १० ऑगस्ट

सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे

बीएलओंनी नवीन मतदार नोंदणी, दुबार, मयत, स्थलांतरित यांचीही नोंद घ्यावी. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. दुसरीकडे सध्या ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी रामवाडीच्या गोदामात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत उपस्थित राहावे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT