महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2024: शिंदेंना मिळणार लोकसभेच्या १४ जागा पण उमेदवार निवडीत एकच अट?

१३ खासदारांसह अणखी एक अशा १४ जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे |BJP has shown its readiness to give 14 seats including 13 MP|

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Maharashtra Loksabha Election 2024 : युतीधर्माला जागत शिवसेना शिंदे गटाला १४ खासदार देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे, मात्र उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेण्याची अट ठेवली आहे.

दोन-तीन दिवस सतत चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला त्यांच्याकडे असलेल्या १३ खासदारांसह अणखी एक अशा १४ जागा देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. (BJP has shown readiness to give 14 seats.)


राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सहा जागा देण्यास भाजप तयार आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी उमेदवार निवडीबाबत आपल्याला विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाशी कित्येक वर्षांच्या युतीमुळे जुने संबंध आहेत.(six loksabha seats to ncp ajit pawar)

त्यांनी जागा घोषित करताना आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणत त्यांच्या सहकाऱ्यांनी जागा मागून घेतल्याची भाजपची भावना आहे. एकीकडे शिवसेनेला ही मैत्रीपूर्ण समज देतानाच दुसरीकडे भाजपने आपल्या कार्यकर्त्यांनाही समजावून सांगण्याचा मार्ग निवडला आहे.(shivsena ncp bjp)

हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपच्या मंडळींना उमेदवार कोणता द्यायचा हे ठरवणे हा त्या पक्षाचा अधिकार आहे, असे फडणवीस यांनी समजावून सांगितले. (Opposition to Hemant Patil's candidature in Hingoli)

युतीधर्माचे पालन करत शिवसेनेला निवडून देण्यासाठी कामाला लागा, असेही समजावून सांगितले. चार तासांच्या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, रायगड, शिरूर आणि महादेव जानकरांना देण्यात आलेली परभणी अशा चार तसेच अद्याप जाहीर न झालेल्या उस्मानाबाद, नाशिक या दोन किंवा लक्षद्वीप अशा सहा जागा लढवेल. (Work to elect Shiv Sena following the alliance)

काही उमेदवार बदलण्याची शक्यता


शिवसेना शिंदे गटाने रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी, बुलढाणा, मावळ, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली अशा आठ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील काही बदलले जाण्याची शक्यता आहे.

याबरोबरच कल्याण, यवतमाळ, पालघर, मुंबईतील दोन आणि नाशिक, ठाणे यापैकी एक जागा लढवेल, अशी आखणी झाली आहे. रामटेक येथे ज्याप्रमाणे उमेदवार बदलण्यास मान्यता दिली तसेच धोरण ठेवावे, अशी अट घातली आहे. जागा जिंकण्यासाठी हे आवश्यक असल्याचेही समजावून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT