Amit-Shah 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019 : बारामतीच्या मुळावरच घाव घाला - अमित शहा

सकाळवृत्तसेवा

बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा,’’ असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बारामतीत केले.
शरद पवार व राहुल गांधी यांना लक्ष्य करीत अमित शहा यांनी आज बारामतीत जोरदार बॅटिंग केली. 

शहा म्हणाले, ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुरू असलेली देशातील घराणेशाही संपविण्याचे काम मोदी यांनी सुरू केले आहे. जे कुटुंबाचे भले करण्याच्या मागे आहेत; ते देशाचे भले करू शकणार नाहीत. त्यामुळे मोदींचे हात बळकट करा. त्यांनी गरिबी पाहिली व अनुभवली आहे. त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने गरिबी दूर करू शकतात. पाच पिढ्या व ५५ वर्षे राजकारण करणाऱ्या गांधी 
परिवाराला गरिबी हटविणे जमणार नाही.’’ 

पवारांनी हिशेब द्यावा...
देशात ५० वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात दहा वर्षे मंत्री असलेल्या शरद पवार यांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला, हे सांगावे, असा सवाल करीत भाजप युवा मोर्चाचे युवक पवारांशी चौकात चर्चा करायला तयार आहेत. पवार हे कृषिमंत्री असताना कच्ची साखर आयात करीत होते. ती मोदींनी थांबविली. त्याचा ऊस उत्पादकांना फायदा झाला. त्यामुळे कारखानदारी बळकट झाली. आम्ही न मागताही पाच वर्षांचा हिशेब दिला आहे. शरद पवार आपण काय केले, याचा हिशेब द्यावा,’’ असे आवाहन शहा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill Injury Update : शुभमन गिलला झालेली दुखापत गंभीर, रुग्णालयात केलं दाखल; BCCI ने प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Nashik Municipal Elections : पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड; एकाच दिवसात नगराध्यक्षपदासाठी १८, सदस्‍यपदासाठी ३२४ अर्ज दाखल!

फॉर्च्युनरची ट्रॅक्टरला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू; कारचा चुराडा, घटनास्थळी हादरवणारं दृश्य

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाची जय्यद तयारी सुरु...! हेमा मालिनी म्हणाल्या...'आता प्रत्येक दिवस आमच्यासाठी...'

Latest Marathi Breaking News Live : पुण्यातील मनसेचे नेते घेणार राज ठाकरेंची भेट

SCROLL FOR NEXT