MNS
MNS 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रिंगणाबाहेर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी पत्रक काढले असून, राज ठाकरे यांच्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाला पक्षाचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी दुजोरा दिला. 

राज ठाकरे यांनी मंगळवारी (१९ मार्च) पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे. राज ठाकरे काँग्रेस आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्हे आहेत. ९ मार्चला झालेल्या मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला होत. हा सस्पेन्स आजच संपला असून, १९ मार्चला राज ठाकरे हे काँग्रेस आघाडी किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज ठाकरे यांची भूमिका उद्या ठरणार
राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना रंगशारदा या ठिकाणी मंगळवारी राज ठाकरेंनी बोलावले आहे. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्या निर्णयाच्या विरोधी निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT