MNS
MNS 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : 'मनसे'च्या खात्यामधून राज यांच्या सभांचा खर्च

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात लोकसभेच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रचारसभा मात्र घेणार आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसल्याने निवडणूक आयोग सभांचा खर्च कसा ग्रहित धरणार असा प्रश्‍न उपस्थित झाला असता पक्षाच्या खात्यात संबंधित खर्च ग्राह्य धरला जाईल, अशी माहिती आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारंसहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात होणारा दैनंदिन खर्च दररोज निवडणूक आयोगाला सादर करण्याचे बंधनकारक आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला 70 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच जाहीर सभा किंवा अन्य खर्च पक्षाच्या नावावर दाखवता येतो. राजकीय पक्षांना मात्र कोणतीही खर्चाची मर्यादा नाही. यंदाचा लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र भाजप सरकारच्या विरोधात सभा घेणार असल्याचा निश्‍चय त्यांनी केला आहे.

येत्या गुढी पाडव्याला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. या व्यतिरिक्‍त राज्याच्या अन्य भागांतही सभा होणार आहेत.

निवडणुकीच्या मैदानात मनसेचे उमेदवार नसताना राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च आयोगाला सादर करावा लागणार आहे. मात्र, संबंधित खर्च कोणत्या खात्यावर दाखवावा असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. यावर हा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खात्यावर दाखविण्यास मुभा आहे, असे आयोगातील अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT