arvind shinde bogus vote
arvind shinde bogus vote esakal
महाराष्ट्र

Arvind Shinde : पुण्यात काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावे बोगस मतदान? अनेकांची नावं मतदार याद्यांमधून गायब.. 'या' दिग्गजांचा समावेश

संतोष कानडे

Pune Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघासह नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. परंतु मतदानाला गेलेल्या अनेक दिग्गजांना मतदानाचा हक्क बजावता येत नाहीये. मतदार यादीमध्ये नाव नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याचाही दावा केला जात आहे. (Bogus vote in name of Arvind Shinde congress city president)

अरविंद शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान मतदान केंद्रावर उपस्थित असताना त्यांच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली. या घटनेने धक्का बसलेल्या शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

टेंडर व्होट सुविधेअंतर्गत त्यांना मतदानाची संधी देण्यात आली आहे, परंतु या मताची गणना केली जाईल की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. शिंदे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचंदेखील नाव मतदार यादीमध्ये नसल्याची माहिती आहे. तरीही ते दुपारी उशिरापर्यंत मतदार यादीमध्ये नाव शोधत होते. त्यांच्यासह सुयश टिळक, सावनी रवींद्र यांचीही नावं मतदार यादीमध्ये सापडलेली नाहीत.

प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सावनीनं मतदार यादीत तिचं नाव नसल्यानं संताप व्यक्त केला आहे. "मत न देताच परत यावे लागले, हे अत्यंत खेदजनक आहे", असं सावनीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार विश्वंभर चौधरी यांच्यासह शकुंतला गायकवाड, हरिप्रसाद वाळिंबे यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे. वडगाव शेरी येथील हरिप्रसाद वाळिंबे यांच्या पत्नीचं आणि मुलींची नावे यादीमध्ये आहेत. परंतु त्यांचं नाही. विश्वंभर चौधरी यांच्यासह त्यांच्या पत्नीचं नाव यादीमध्ये नव्हतं. तर शिरुर मतदारसंघातील शकुंतला गायकवाड ह्या परिचारिका आहेत. त्यांचंही नाव त्यांना सापडलं नसल्याने मतदानापासून वंचित राहावं लागलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत विक्रमी शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT