Congress MLA Vishwajeet Kadam esakal
महाराष्ट्र बातम्या

PM मोदींनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख, 2 कोटी नोकऱ्या देण्याची फक्त स्वप्नं दाखवली; विश्वजित कदमांचा हल्लाबोल

मोदी सरकारने नोटबंदी करून जनतेस वेठीस धरले.

सकाळ डिजिटल टीम

शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा वारसा जतन करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

मिरज : देशामध्ये २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोदींनी जनतेला फक्त स्वप्ने विकण्याचे काम केले. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख, महागाईमुक्त देश, २ कोटी नोकऱ्यांची स्वप्ने दाखवून फसवणूक केली, असा हल्लाबोल माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला.

काँग्रेसतर्फे (Congress Jansanvad Yatra) जनसंवाद पदयात्रेला तालुक्यातील बेळंकी येथून सुरवात झाली. काल सायंकाळी मालगाव ते मिरज पदयात्रा निघाली. तिची सांगता किसान चौकात आयोजित सभेत झाली, त्या वेळी विश्वजित कदम बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंक उपाध्यक्ष जयश्री पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शैलजा पाटील, डॉ. जितेश कदम आणि राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे प्रमुख उपस्थित होते.

विश्वजित म्हणाले, सांगली जिल्हा, मिरज तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या पुढेही मिरजकरांनी दिलेला आशीर्वाद इतिहास घडवेल. मोदी सरकारने नोटबंदी करून जनतेस वेठीस धरले. राज्य सरकारने उद्योगधंदे परराज्यात पाठवले. त्यामुळे राज्यात बेरोजगारी निर्माण झाली आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा वारसा जतन करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Congress MLA Vishwajeet Kadam

यशवंतराव चव्हाण, वसंतदादांनी महाराष्ट्रासह देशाचे नेतृत्व केले. पतंगराव कदम, गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी काम केले. काँग्रेसने ७५ वर्षे देश एकत्रित ठेवला. मात्र सध्याचे सरकार जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहे. विविध राज्यांतील विरोधी सरकार पाडण्याचे पाप केले जात आहे. जनता याला योग्य वेळी उत्तर देईल, असाही त्यांनी इशारा दिला.

विशाल पाटील म्हणाले, प्रत्येक शहरातील मिळकतीवर खासदारांचे नाव चढले. लोकांच्या जीवावर कोट्यधीश नव्हे, तर अब्जाधीश केलं. सामान्यांच्या जमिनी लाटून स्वतःची मालमत्ता जमविण्याचे काम खासदारांनी केलं. काँग्रेसची जनसंवाद यात्रा लोकांचा आवाज बनली, असा विश्वास पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, बाळासाहेब होनमोरे यांनी व्यक्त केला. यावेळी अय्याज नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक संजय मेंढे, करण जामदार, धनराज सातपुते, जहिर मुजावर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT