CM SHINDE  esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रेम सुरत मध्ये, हनिमून गुवाहाटी मध्ये मग लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का?

राष्ट्रवादीचा शिंदे गटावर निशाना

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचं राजकारण मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्याभोवती फिरत आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. अखेर शिंदे गटाने दसरा मेळावा बीकेसीवर घेण्याचं नाईलाजाने मान्य केलं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होणार असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.

या मेळाव्यांना गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत असून एकमेकांवर हल्लाबोल करत आहे. या वादामध्ये राष्ट्रवादी उडी घेत असल्याची चर्चा असतानाच शरद पवारांनी आता शिंदे आणि ठाकरे दोघांनाही सुनावलं आहे. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांविषयीही त्यांनी भाष्य केलं होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे.

त्यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की "गद्दारांचे.. प्रेम झाले सुरत मध्ये, हनिमून झाला गुवाहाटी मध्ये पोटात कळ आली गोवा मध्ये.... मग मी म्हणतो, लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का? असं ट्विटमध्ये म्हणाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान दरसा मेळावे येत्या बुधवारी होणार आहेत. शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा BKC वर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता रखडणार? नवे नियम काय आहेत?

Pune Drug Bust: चौफुला-धायगुडेवाडी येथे २९ किलो गांजासह २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवत पोलिसांची धडक कारवाई

MI vs RR Live : ३ तासांची प्रतीक्षा अन् मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना सुरू होणार; किती षटकांची मॅच, किती वाजता?

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

SCROLL FOR NEXT