Mahadevi elephant Kolhapur people protest for elephant Vantara return Dhairyashil Mane reaction esakal
महाराष्ट्र बातम्या

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Mahadevi Elephant Return To Kolhapur : महादेवी हत्तीण कोल्हापूरच्या संस्कृतीचा भाग असून तिचं वनतारा अभयारण्यात स्थलांतर करण्यात आलं. या विरोधात कोल्हापुरात हजारो नागरिकांनी आत्मक्लेष पदयात्रा काढली.

Saisimran Ghashi

  • महादेवी हत्तीणीला वनतारा अभयारण्यात पाठवल्याने कोल्हापूरकरांनी आत्मक्लेष पदयात्रा काढली.

  • खासदार धैर्यशील माने यांनी हत्तीणीच्या परतीबाबत सकारात्मक निर्णयाची आशा व्यक्त केली.

  • रिलायन्स जिओवर बहिष्कार आणि पेटावर षडयंत्राचा आरोप करत आंदोलन तीव्र झाले.

कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख असलेली महादेवी हत्तीण वनतारा अभयारण्यात पाठवल्याने कोल्हापूरकर संतप्त झाले आहेत. या विरोधात आज रविवारी पहाटे नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी, “महादेवी हत्तीणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल,” असे आश्वासन देत कोल्हापूरकरांना दिलासा दिला.महादेवी ही नांदणी मठातील हत्तीण असून, ती कोल्हापूरकरांच्या भावनांचा भाग आहे. तिला गुजरातमधील वनतारा अभयारण्यात पाठवल्याने स्थानिकांमध्ये असंतोष पसरला. पदयात्रेत काही ग्रामस्थांनी आपल्या देवघरातील सोन्याच्या हत्तीच्या मूर्ती डोक्यावर घेऊन सहभाग नोंदवला

“महादेवी आमच्या घरातील सोन्यासारखी आहे, तिला परत आणा,” अशी भावनिक मागणी त्यांनी केली. पदयात्रेदरम्यान खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. माने यांनी पेटा संघटनेच्या भूमिकेवर टीका करत, “पेटाने यांत्रिक हत्ती देण्याची चेष्टा करू नये,” असे सांगितले.

दरम्यान, रिलायन्सच्या वनतारा प्रकल्पाच्या सहभागामुळे ७०० हून अधिक गावांतील नागरिकांनी जिओ सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.राजू शेट्टी यांनी या प्रकरणाला “षडयंत्र” ठरवत, पेटाच्या तक्रारीमुळे हत्तीण पाठवल्याचा आरोप केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरकरांचा लढा तीव्र झाला असून, महादेवीच्या परतीसाठी सर्वांचे डोळे प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहेत

FAQs

  1. Why are Kolhapur citizens protesting for Mahadevi elephant?
    कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीसाठी का आंदोलन करत आहेत?

    महादेवी हत्तीण ही कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि भावनिक ओळखीचा भाग आहे. तिला वनतारा अभयारण्यात पाठवल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

  2. What was the Atmaklesh Padayatra in Kolhapur?
    कोल्हापुरातील आत्मक्लेष पदयात्रा काय होती?

    महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेली आंदोलनात्मक पदयात्रा होती.

  3. What role did PETA play in the Mahadevi elephant issue?
    महादेवी हत्तीण प्रकरणात पेटाची काय भूमिका होती?

    पेटाच्या तक्रारीमुळे महादेवीला वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आले, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

  4. Why are people boycotting Jio in Kolhapur?
    कोल्हापुरात लोक जिओवर बहिष्कार का टाकत आहेत?

    वनतारा अभयारण्य रिलायन्सशी संबंधित असल्याने ७०० हून अधिक गावांतील लोकांनी जिओ सिम पोर्ट करण्यास सुरुवात केली.

  5. What assurance did MP Dhairyashil Mane give regarding Mahadevi?
    खासदार धैर्यशील माने यांनी महादेवीबाबत काय आश्वासन दिले?

    महादेवी हत्तीणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल, असे खासदार माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : २४ तासांत आणखी टॅरिफ लावणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा भारताला धमकी....

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बीडमध्ये बॅनर वॉर

मी ज्या नोटांवर नाचले त्या खोट्या... बेस्टच्या पार्टीमधील व्हिडिओवर माधवी जुवेकरचं स्पष्टीकरण; म्हणाली, 'फक्त माझ्याच बातम्या...

ENG vs IND: शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून 'या' दोन खास गोष्टी घेऊन जाणार; फोटो आले समोर

Mumbai Local: आता लोकलचा वेग आणखी वाढणार! प्रशासनाकडून या मार्गांवरील वेगमर्यादा शिथिल

SCROLL FOR NEXT