राष्ट्रकुल स्पर्धेच्या 55 किलो वजनी गटात भारताच्या संकेत सरगरने (Sanket Sargar) रौप्य पदक (Silver Medal) जिंकले. त्याने एकूण 248 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक आहे. देशाभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून तीस लाखांचे पारितोषिक त्याला जाहीर करण्यात आले आहे.(CM Shinde announces Rs 30 lakh reward for weightlifter Sanket Sargar)
सांगली जिल्ह्यातील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत सरगर याची बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघामध्ये निवड झाली होती. वेटलिफ्टिंगमध्ये अशी निवड होणारा संकेत महाराष्ट्रातील पहिला खेळाडू होता. आता त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक पटकावून सांगलीचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले.
राष्ट्रकुल स्पर्धा 2022 स्पर्धेतील वेटलिफ्टिंग खेळातील 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीकर संकेत सरगर ला राज्य सरकारच्या वतीने 30 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर. तसेच संकेतला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना 7.5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे दिली आहे.
वयाच्या 13 व्या वर्षी पासून सुरु झाला. 2013-14 पासून सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये त्याने वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली. मग 2017 सालपासून मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुढील सराव सुरु केला. विशेष म्हणजे मयूर सिंहासने हे देखील उत्तम वेटलिफ्टर होते पण काही कारणांमुळे ते 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेऊ शकले नाही, पण यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये आपल्या शिष्याकडून देशाला पदक मिळवून देण्याचं ध्येय पुर्ण करण्यात त्याला यश मिळालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.