Corona Guidelines For New Year Celebrations sakal media
महाराष्ट्र बातम्या

थर्टीफर्स्ट, नववर्ष साजरं करताय? ही नवी नियमावली वाचा...

वाढत्या ओमिक्रॉनबाधितांच्या भीतीमुळं वाढवले निर्बंध

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या (corona infections) पार्श्वभूमीवर येत्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या (new year) स्वागत सोहळ्यांसाठी राज्य शासनानं नवी नियमावली (news covid guidlines) जाहीर केली आहे. यामध्ये खबरदारी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यंदा हे सोहळे अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असं या नियमावलीत म्हटलं आहे. (Maha govt issue new corona guidelines for thirty first and New Year celebrations)

अशी आहे नवीन नियमावली..(Corona Guidelines For New Year Celebrations)

१) थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरीच साधेपणानं सोहळा करावा.

२) २५ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचं काटेकोरपणे पालन व्हावं.

३) थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेत २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

४) या ठिकाणी गर्दी न होता सोशल डिस्टंसिंगचं पालन व्हाव. मास्क, सॅनिटायझरच्या वापराकडं विशेष लक्ष दिलं जावं तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावं.

५) ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी आरोग्याच्या सुरक्षेसाठी शक्यतो घराबाहेर जाण टाळावं.

६) ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्त्यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करु नये. सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं. मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराकडे विशेष लक्ष द्यावं.

७) मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आदी ठिकाणी गर्दी करु नये.

८) नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारच्या धार्मिक-सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढू नयेत.

९) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात १ जानेवारी रोजी बहुसंख्य लोक धार्मिकस्थळी जात असतात. अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. या ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य खबरदारी घ्यावी.

१०) फटाक्यांची आतषबाजी करु नये, ध्वनिप्रदुषणच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन व्हावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT