महाराष्ट्र बातम्या

20 दरड कोसळल्या, महाबळेश्वर-पोलादपूर महामार्गावर गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा

मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पावसाने जनजिवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, कोयना, महाबळेश्वर आणि तापोळा या भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून प्रमाणापेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर दुर्गम भागातील परिस्थिती हळूहळू समोर येऊ लागली आहे. 22 आणि 23 तारखेच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर महामार्गावर जवळपास 20 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणाणी रस्त्याची मोठी हाणी झाली असून रस्ताच गायब झाला आहे.

अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-पोलादपूर हा रस्ताच वाहून गेला आहे. ठिकठिणी दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला असून परिणाणी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे वाहतुकीचे कोणतेच साधन नसल्याने या भागातील लोकांपर्यंत अजूनही कोणतीही मदत पोहचलेली नाही. या रस्त्यावर जवळजवळ 20 ठिकाणी दरड कोसळल्याने यंत्रणा अजूनही इकडे पोहचल्या नसून अतिशय बिकट परिस्थिती इथल्या गावांची आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या 53 गावांत अद्याप कोणतीही मदत पोहचली आहे. कुमठा, शिरवली, दुजगाव, बिरवाडी, हतलोड, कासरूड, घोणसपूर, झानजवड या गावांसह इतर गावांचेही प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील जनजिवन पूर्णपणे उद्वस्त झाले आहे. काही गांवाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून ही गावे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT