Crime News 
महाराष्ट्र बातम्या

Crime News : कोरोना काळात पॅरोलवर सुटलेले 350 कैदी परतलेच नाही; आता पोलिसांना...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कोविड-१९ च्या महामारीच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल 4253 कैद्यांना पॅरोलवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु कैद्यांना जेव्हा परत बोलावण्यात आलं तेव्हा सुमारे 400 कैदी परतले नाहीत. आतापर्यंत १८ कैद्यांना मुंबई पोलिसांनी पकडून पुन्हा कारागृहात डांबलं आहे.

मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, कोविडमधील गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. जेव्हा कोविड संपला तेव्हा त्यांना परत तुरुंगात रिपोर्ट करायचा होता, परंतु ते आले नाही.

चौधरी म्हणाले की, आम्ही संपूर्ण यादी घेतली असून त्यानुसार सर्व पोलिस ठाण्यांना काम देण्यात आले आहे. आतापर्यंत आम्ही 18 जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे. काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रातील 20 तुरुंगांमध्ये 35,000 हून अधिक कैदी आहेत, जे तुरुंगांच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त आहेत. वाढत्या संसर्गाचा धोका बघून 2020 मध्ये महाराष्ट्रातील कारागृहातून 4253 कैद्यांना गर्दी कमी करण्यासाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र कोविड संपल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची वेळ आली, तेव्हा सुमारे 400 जण भूमिगत झाले आहेत.

मुंबई कारागृहातून 72 कैद्यांची सुटका झाली होती. त्यातील काही तुरुंगात परतले तर काही जण अज्ञातवासात गेले. त्यामुळे आता त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT