Sangali Photo 
महाराष्ट्र बातम्या

सांगली : मुलं पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण केल्याप्रकरणी ६ जणांना अटक

सांगलीतील लोकांनी या साधूंना मारहाण केली होती.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : मुलं पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण करणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. लवंगा गावातील ग्रामस्थांकडून काल या साधूंना मारहाण केली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण झालेल्या साधूंना रुग्णालयात दाखल केलं होतं. सांगली पोलिसांनी ही माहिती दिली. (Maharashtra 6 arrested for thrashing monks in Sangli village)

सांगलीचे पोलीस अधीक्षक गेडाम म्हणाले, पोलिसांनी स्वतःहून दखल घेत या साधूंना मारहाण करणाऱ्या ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी लवकरच सुरु होईल, तसेच आणखी काही आरोपींना लवकरच अटक केली जाईल. मारहाण झालेल्या साधुंनी याप्रकरणी स्वतःहून पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. पण व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी ही कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील काही साधू हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून निघाल्यानंतर ते कर्नाटकच्या बिजापूर इथं जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, सांगलीत पोहोचल्यानंतर त्यांनी काही लहान मुलांकडे मदत मागितली. पण ही मुलं पळवणारी टोळी समजून स्थानिकांनी या साधूंना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

दरम्यान, मारहाण झालेले साधू हे मथुरेतील पंच दर्शन जुना आखाड्यातील साधू आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs ZIM : वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढतीचा निकाल टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; सूर्याचा संघ Semi Final च्या शर्यतीतून बाहेर होणार

Operation Bajrang: मथुरेत २५० जवानांनी गावाला घातला वेढा; मिनी जमतारातून ३४ सायबर भामटे गजाआड, तर ४५ जण शेतातून पळाले

५०० रुपयात कुणासोबतही झोपता, तर माझ्या पतीसोबत...; दिल्लीत तरुणींसोबत दाम्पत्याचं गैरवर्तन

Latest Marathi News Live Update : कृष्णा नदीतील शेकडो माशांचा मृत्यू, शेरीनाल्याचे सांडपाणी व मयूषित पाण्यामुळे मृत्यूचा आरोप

Nashik Accident : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा गेला! नाशिकमध्ये भरधाव कारच्या धडकेत दहावीचा विद्यार्थी ठार

SCROLL FOR NEXT