Adhar Card  esakal
महाराष्ट्र बातम्या

AADHAR:राज्यातील साडेसात लाख विद्यार्थ्यांना 'आधार' नाही, तर सहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये चुका

राज्यातील साडेसात लाख विद्यार्थी आधारपासून 'वंचित', सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांच्या माहितीत विसंगती

सकाळ डिजिटल टीम

AADHAR Card Updates: शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही राज्यातील तब्बल सात लाख ४० हजार १७६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे, तर सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांच्या माहितीत विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे.


विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप शालेय पोषण आहार विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना तसेच शाळांना विद्यार्थी संख्येनुसार अनुदान देण्यात येते. बोगस पटसंख्या रोखण्यासह ‘आधार’नुसार योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणी अद्यावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

संबंधित काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शिक्षण विभागाकडून शाळांची संचमान्यता ही आधार संख्येवरच केली जाणार असल्याने ते कामही प्रलंबित आहे. शिक्षण विभागाच्या सरल संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात दोन कोटी सात लाख ७७ हजार ६३९ विद्यार्थ्यांपैकी दोन कोटी ३७ हजार ४६३ विद्यार्थ्यांची माहिती स्टुडंट पोर्टलवर भरण्यात आली आहे. त्यापैकी एक कोटी ८८ लाख २६ हजार २१८ विद्यार्थ्यांची आधार कार्डवरील माहिती वैध ठरली आहे. सहा लाख ७० हजार ७२ विद्यार्थ्यांची सरल संकेतस्थळावरील माहिती आणि आधार कार्डवरील माहिती विसंगत आहे. या माहितीमधील विसंगती शाळांनी दूर करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

मुंबईतील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, " अनेक विद्यार्थी व पालक आधारकार्डची दुरुस्ती करीत नाहीत. वारंवार सांगूनही दुर्लक्ष करतात. जे विद्यार्थी हजेरी पत्रकावर आहेत, तेच विद्यार्थी सरळ पोर्टलवर ग्राह्य धरावेत. कारण दाखला पडताळणी केलेली असते. त्यानुसार संख्या निश्चित होते तसेच संचमान्यता ऑनलाइन न करता ऑफलाइन करावी." Latest Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोशन भजनकर Bigg bossमध्ये कसा आला? Video पाहून तुम्हीही विदर्भाच्या पठ्ठ्याला सलाम कराल

Mumbai Marathon: आशियाई स्पर्धेसाठी पात्रतेचा निकष कमी हवा; मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर परभणीची धावपटू ज्योती गवते हिचे मत!

Student Endlife : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, व्हिडिओमध्ये म्हणाला- पप्पा मला माफ करा...

Nashik Kalaram Sansthan : काळाराम संस्थानचा ऐतिहासिक निर्णय: दोन टर्मनंतर तिसरी संधी नाही; विश्वस्तांची मक्तेदारी संपणार?

Akola Municipal Election: अकोला मनपा निवडणुकीत भाजप अव्वल; काँग्रेस, वंचितने साधला गेम, राष्ट्रवादी व शिंदेसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

SCROLL FOR NEXT