Cold wave in Maharashtra  Esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात 24 तासांत थंडी कमी होणार; पंजाबसह 'या' भागात लाट

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून पश्चिमी चक्रवातामुळे (Cyclonic) गारठा वाढला आहे. मात्र येत्या २४ तासात महाराष्ट्र (Maharashtra)आणि मराठवाड्यात थंडी कमी होणार आहे. तर पंजाब, पश्चिम मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर मध्य या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Cold Wave News Updates)

दरम्यान २ ते ४ फेब्रुवारीत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका,मध्यम पाऊस तसेच बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर 3 फेब्रुवारी रोजी परिसरात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ठिकाणी पडणार पाऊस

बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये तीन ते चार फेब्रुवारीमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडणार आहेत. आणि चार ते पाच फेब्रुवारी दरम्यान आसाम, मेघालय,नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मध्यम हलक्या सरी कोसळणार आहेत.

महाराष्टात औरंगाबाद-लातूरमध्येही हुडहुडी

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे. परभणी शहरात शनिवारी (ता.२९) यंदाच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. तापमानाचा पारा ५.६ अंशांवर घसरला. त्या पाठोपाठ औरंगाबाद ८ तर लातूर शहराचे तापमान ८.५ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले. दरम्यान, आगामी दोन दिवसांत तापमानाचा पारा परत वर चढण्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT