महाराष्ट्र बातम्या

Assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नवीन समीकरण; संभाजीराजे अन् बच्चू कडू एकत्र येणार? दोघांमध्ये झाली चर्चा...

पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

संतोष कानडे

Sambhajiraje Chhatrapati : राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये दोन पक्षांचे चार पक्ष झाले असून भाजपलादेखील म्हणावा तसा आत्मविश्वास उरला नसल्याचं दिसून येतंय. त्यातच आता एक नवीनच समीकरण राज्याच्या राजकारणात पुढे येताना दिसून येत आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रंची माहिती आहे. उभय नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढवण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

तसे झाले तर स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना आणि राज्यातील अनेक छोटे-मोठे घटकपक्ष मिळून एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते. त्याचा परिणाम विद्यमान सरकार आणि विरोधी महाविकास आघाडीवर होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मुळात हे नवीन समीकरण अस्तित्वात येतं की नाही, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT