Maharashtra Assembly Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Assembly Session: राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमदारांना व्हीप बजावण्याची शक्यता; अधिवेशनात कोणाचा व्हिप चालणार?

उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 17 जुलैपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केलं आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरणार असल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)

पक्षफुटीमुळे विरोधी पक्षासमोर सरकारची कोंडी करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. सरकारला घेरण्याची संधी आम्ही सोडणार नाही असे नाना पटोले आणि आंबादास दानवे यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. प्रतोद अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

तर अनिल पाटील म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षापासून व्हीप बजावण्याचे काम किंवा पक्षादेश देण्याचे काम मी सातत्याने करत आहे. त्यापद्धतीने सगळ्या आमदारांना नेहमीप्रमाणे व्हीप बाजवला जाईल. पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझी येणाऱ्या काळासाठी व्हीप म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे मी बजावलेला व्हीप नाकारण्याची काही संबंध नाही. परंतु नाकारला तर त्याबाबत योग्य तो निर्णय पक्ष श्रेष्टी घेतील असंही ते म्हणालेत.

एकीकडे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील व्हीप जारी करणार आहेत. तर दुसरीकडे, शरद पवार गटाकडून नवे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा व्हिप लागू होणार का? विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT