PM Modi Devendra Fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधान १५ लाख देण्याचं कधीच बोलले नाही, फडणवीसांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा बाहेर आणून देशातल्या नागरिकांना १५-१५ लाख रुपये देईन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले होते. त्या १५ लाखांचं काय झालं? असा सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत (Maharashtra Minister Nitin Raut) यांनी उपस्थित केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) चांगलेच आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं कधीच बोलले नाही. मी तुम्हाला खुलं आव्हान देतो, पंतप्रधान असं बोलल्याचा पुरावा द्या, असा दावा फडणवीसांनी केला.

शेतकऱ्यांना सूट देण्याचं मोदींनीही जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांना ५० ५० लाख त्यांच्यात खात्यात देईन, असं मोदी म्हणाले होते. त्यांनी दिले का? असा प्रश्न ऊर्जामंत्र्यांनी विचारला. त्यानंतर फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. देशाचे पंतप्रधान मोदींनी अस म्हटल्यांचं हे दाखवून द्यावं, नाहीतर सभागृहाची माफी मागावी. सभागृहात नसलेल्या व्यक्तीबद्दल चुकीचं वक्तव्य करता येणार नाही. मी खुलं आव्हान देतो, की मोदींनी असं म्हटल्याचा एक तरी पुरावा दाखवा, माफी मागा नाहीतर हे चालू देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

ऊर्जामंत्री परत म्हणाले, ''देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा बाहेर आणून देशातल्या नागरिकांना १५-१५ लाख रुपये देईन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्या १५ लाखांचं काय झालं?'' त्यावर देखील फडणवीस आक्रमक झाले आणि हे चुकीचं वक्तव्य असल्याचं फडणवीस म्हणाले. पंतप्रधान असं कधीच बोलले नाही. ते असं म्हणाले याचा पुरावा द्या, मी तुम्हाला खुले आव्हान देतो, असं फडणवीस म्हणाले.

भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल -

पंतप्रधानांनी १५ लाख देण्याची घोषणा केलीच नाही, या फडणवीसांच्या दाव्यानंतर भास्कर जाधव यांनी मोदींच्या घोषणेची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी मोदींच्या शैलीत बोलत त्यांची नक्कल केली. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर मी नक्कल केली नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. पण, विरोधकांनe ते अंगविक्षेप वाटत असतील, तर मी ते मागे घेतो, असं जाधव म्हणाले. तरीही भास्कर जाधवांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Mhada Lottery: मुंबईकरांची गृहस्वप्नपूर्ती! म्हाडाच्या २,६४० घरांची सोडत जाहीर; पुढील लॉटरी कधी?

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT