new maharashtra bhavan in jammu and kashmir 
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde News: अयोध्येनंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये देखील उभारणार महाराष्ट्र भवन! CM शिंदेंनी घेतला पुढाकार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रातून जम्मू-काश्‍मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी श्रीनगरमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शिंदे यांनी जम्मू आणि काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे केली.

महाराष्ट्र-जम्मू काश्‍मीरचे सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहू, असेही शिंदे यांनी सिन्हा यांना सांगितले. सध्या शिंदे जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र भवनाच्या मागणीसह अन्य विषयांवरील चर्चेसाठी शिंदे यांनी सिन्हा यांची भेट घेतली.

या भेटीत भवनाच्या जागेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी सिन्हा यांना पत्रही दिले. ‘‘महाराष्ट्र भवनमुळे दोन्ही राज्यांतील पर्यटकांना फायदा होईल. त्यामुळे भवनाच्या उभारणीसाठी पुरेशी आणि योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी.

जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्यांची उभारणी करून ते लवकर लोकांसाठी उपलब्ध करेल,’’ असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे ‘सरहद’कडून स्वागत

काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाचे स्वागत असून, महाराष्ट्रातही काश्मीर भवन उभारण्यात यावे, अशी मागणी सरहद संस्थेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

‘‘जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे पर्यटक सर्वाधिक जातात. भवनासाठी रेल्वे आणि विमानतळापासून जवळ असलेली आमची पिढीजात जमीन मी देऊ केली आहे,’’ असे संस्थेचे झाहिद भट म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT