Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

'मविआ सरकारच्या काळात आदिवासी समाज कमिटीची बैठक झाली का?'

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या अर्थसंकल्पाने सामान्य माणसाची घोर निराशा केलीय आम्ही या ठाकरे सरकारच्या बजेटचा धिक्कार करतो अशा शब्दात त्यांनी टीका केली. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे.

आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांची कमिटी स्थापन केली होती का?

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आदीवासी आमदार आणि खासदारांच्या कमिटीची बैठक बोलवली जाते. या कमिटीमध्ये विविध प्रकारच्या मागण्या आलेल्या असतात त्या विषय़ी चर्चा केली जाते. यावेळचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांची कमिटी स्थापन करण्यात आली होती का असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, कोणतीही योजना सादर करताना कमिटीची बैठक घ्यावी लागते. या बैठकीला देखील घटनात्मक स्थान आहे. आदीवासी समाजासाठी विविध घोषणा जाहीर करण्यापूर्वी आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांची कमिटी स्थापन केली होती का? देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक वेळा या कमिटीची बैठक झाली. परंतु मविआ सरकारच्या काळात या कमिटीची बैठक झाली का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी सरकारला विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT