farmer compensation yashwant mane atul pawar tehsildar prashant bedse esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget: फक्त 1 रुपयांत पीकविमा; महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. त्यांनी आपला अर्थसंकल्प पंचामृतावर आधारित असल्याचं म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प मांडत आहेत यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी २०१६च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरेल असं सांगितलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरून पोर्टलवर नोंदणी करावी लागेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासाठी वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्‍यांवर याचा कोणताच भार असणार नाही. हा हप्ता राज्य सरकार भरणार तर शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा देणार असून यासाठी 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

त्याचबरोबर बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आम्ही जाहीर करतो. केंद्र सरकारच्या सहा हजारच्या निधीत राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार असून आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार आहे. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२४-२४ वर्षासाठी ६ हजार ९०० कोटी रुपये निधी प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT