Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 Sakal
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: आता 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही रेशन; अर्थमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.

यामध्ये मोठमोठ्या अनेक घोषणांचा सामावेश आहे. त्याचबरोबर आता केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना मिळणारे धान्य आता बंद होणार असून त्याऐवजी त्यांना थेट पैसे मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं असून पाच मुख्य घटकांवर अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना आता अन्नधान्यांऐवजी थेट पैसे मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना अन्नधान्यांऐवजी मिळणार पैसे?

विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जाणार आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर पैसे दिले जाणार आहेत.

रेशनऐवजी आता मिळणार थेट पैसे

या शेतकऱ्यांना केशरी रेशनधारकांना आता थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पैसे मिळणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. तर एका व्यक्तीला प्रतीवर्षी १८०० रूपये थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

अर्थमंत्र्यांनी शेतीसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार

  • शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.

  • शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार असल्याची मोठी घोषणा फडणवीसांनी केली. यासाठी शेतकऱ्यांना फक्त एक रूपया भरावा लागणार असून शासनातर्फे यावर ३३१२ कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

  • या योजनेचा १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार

  • एकात्मिक पीक आधारित आराखडा तयार करणार

  • "नमो शेतकरी महासन्मान निधी" योजना फडणवीसांकडून जाहीर

  • येत्या तीन वर्षात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाणार

  • देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा

  • नागपूर, अमरावती आणि बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, यासाठी २० कोटींचा निधी

  • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे इ-पंचनामे होणार, त्यासाठी ड्रोन आणि उपग्रहाची मदत घेण्यात येणार आहे.

  • केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्यात येणार आहे. एका व्यक्तीला प्रतीवर्षी एका व्यक्तीला मिळणार १८०० रूपये

  • कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुक्कासाठी सोय करण्यात येणार आहे.

फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठ्या घोषणा

  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांची मदत

  • शेततळे योजनेचा विस्तार करणार

  • मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला हरितगृह मिळणार

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू करणार

  • अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपयांची मदत

  • सेंद्रीय शेतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद

  • राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाईल

  • बुलढाण्यात संत्रा प्रकल्प प्रक्रियेसाठी ३० कोटींची तरतूद

  • काजू प्रक्रिया उद्योगासाठी १ हजार ३५४ कोटींचं अनुदान

  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रतीहेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

  • जलयुक्त शिवार भाग २ ची योजना फडणवीसांकडून जाहीर

  • महाकृषी अभियान जाहीर

  • मच्छिमारांसाठी ५ लाखांचा विम्याची घोषणा

  • मागेल त्याला ठिबक सिंचन आणि शेततळे योजना

  • पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्वेकडे वळवण्यासाठी भरघोस निधीची तरतूद

  • नदीजोड प्रकल्पासाठी शासनाचा निधी देणार

  • कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना

  • मेंढी पालकांच्या महामंडळासाठी १० हजार कोटींची तरतूद

  • ३० टक्के कृषीवाहिन्यांचे सौर उर्जीकरण करणार

  • मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पाठपुरावा करणार

  • मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार

  • मराठवाड्यातील दुष्काळ मिटवण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद

  • पुढील वर्षात २७ जल प्रकल्प पूर्ण करणार

  • तापी खोऱ्यातील पाणी पातळी महापुनर्भरण प्रकल्पावर लक्ष देणार

  • अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येईल

  • मेंढीपालानासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे

  • मेंढी शेळी पालनाकरिता १० हजार कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • महाराष्ट्र शेळी व मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापणा करण्यात येणार आहे. त्याचे मुख्यालय अहमदनगर येथे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT