Maharashtra Budget 2023 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2023: तुकोबारायांना वंदन करून फडणविसांनी केली अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात

आज राज्याचं अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget 2023: आज राज्याचं अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात केली आहे. (Maharashtra Budget Dvendra Fadnavis started the budget speech by saluting Tukobaraya)

पहिल्यांदाच राज्यात आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन करण्यात येत आहे. यावेळी तुकोबारायांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचनाला देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. आज तुकाराम बीज दिन, विचारांनी महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या तुकाराम महाराजांना दंडवत करून अर्थसंकल्प सादर करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टिकवावे धन ज्याची आस करुन या ओवीने फडणवीसांनी सुरुवात केली. यावेळी त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प हा पंचामृत ध्येयावर आधारित असल्याचे सांगितले.

१) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

२) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

३) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

४) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

५) पर्यावरणपूरक विकास

Maharashtra Budget 2023 : कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा


असे पाच अमृत सांगत फडणवीस यांनी तुकोबारायांची आणखी एक ओवी वाचून दाखवली. 'एका बीजा केला नास मग भोगिले कणिस' ही ओवी त्यांनी वाचून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT