MLA Sanjay Shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion 2022: शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट नाराज, बैठकीतही खडाजंगी

थोड्याच वेळात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

सकाळ डिजिटल टीम

थोड्याच वेळात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. एकूण 18 आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. अवघ्या काही मिनिटांवर भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदार शपथ घेतील. या दरम्यान शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट नाराज झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या बंडखोरीला आमदारांनी मदत केली अशा अनेक आमदारांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये संजय शिरसाट हे आघाडीवर आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता जवळपास कट झाल्याचं समजंत आहे .

संजय शिरसाट हे आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बंडखोरी करताना अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना मदत केली आहे. त्यामुळे शिरसाट यांना देखील मंत्रिपदाची अपेक्षा आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका वाटू लागली. त्यांचा पत्ता जवळपास कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "यावेळच्या विस्तारात तुमचं नाव नसेल. मात्र पुढच्या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात तुमचं नाव निश्चित असेल. सध्या तरी तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही," असे स्पष्ट संकेत संजय शिरसाट यांना देण्यात आले. त्यामुळे संजय शिरसाट अतिशय नाराज होते.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटाकडून काही नावं पुढ येत आहेत. तर काही नावांवर अद्याप चर्चा सुरुच होती. जुन्या सर्व मंत्र्यांना पुन्हा नव्याने संधी देण्यात येईल. या या नावांमुळे काही नवे चेहरे नाराज असल्याचं समजंत आहे. आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अनेकांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT