shivsena-congress-ncp 
महाराष्ट्र बातम्या

खातेवाटपाचा घोळ संपेना! 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा खातेवाटपाचा घोळ काही केल्या मिटायचे नाव घेत नाहीये. खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची काल सुमारे चार तास बैठक झाली. त्या बैठकीतही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आज (गुरुवारी) संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

मुख्यमंत्री यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 43 आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच्या सर्व म्हणजे 32 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा शपथविधी उरकून तीन दिवस झाले तरीही खातेवाटप जाहीर झालेले नाही. त्यातच मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे या तीन पक्षांच्या इच्छुकांनी, तसेच त्यांच्या समर्थकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी बंडाची भाषा सुरू केली असताना खातेवाटपावरून तिन्ही पक्षांत घोळ सुरू आहे. काही मंत्र्यांना देण्यात येणारे संभाव्य खाते नको आहे, तर काहींनी आपल्या आवडीचे खाते मिळावे म्हणून हट्ट धरला आहे. त्यामुळे या तीन पक्षांच्या श्रेष्ठींसह मुख्यमंत्री ठाकरे यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहखात्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गृहखाते आपणास मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहखाते अनिल देशमुख यांना देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. तर नवाब मलिक यांना उत्पादन शुल्क खात्याऐवजी दुसरे खाते मिळावे अशी मागणी केल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणे कॉंग्रेस पक्षामध्ये महसूल खात्यावरून वाद निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खाते हवे आहे, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे या खात्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. तर कॉंग्रेस पक्षाला कृषी, ग्रामविकास अथवा सहकार यांपैकी कोणतेही एक खाते मिळावे असा प्रयत्न सुरू आहे. तर शिवसेनेत गुलाबराव पाटील यांना कृषी खाते हवे आहे; मात्र ते खाते सुभाष देसाई यांनी स्वीकारावे अशी शिवसेना मुख्यमंत्री ठाकरे यांची इच्छा असल्याचे बोलले जाते. तर दादा भुसे यांनाही कृषी खाते हवे आहे, असे सांगितले जाते. खातेवाटपाच्या या घोळामुळे अद्याप खातेवाटप अधिकृतरीत्या जाहीर होण्यास विलंब लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT