Maharashtra Cabinet Expansion Marathi News Maharashtra Cabinet Expansion Marathi News
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा! समोर आली मोठी अपडेट

रोहित कणसे

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

एकूण १९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून मंत्र्यांच्या खात्यांचा फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion Marathi News)

सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. हा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे गेल्यानं शिंदे सरकार सध्या बचावलं आहे. दरम्यानगेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता सत्तासंघर्षावर निकाल लागल्याने लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांमध्ये हलचाली वाढण्याची शक्यता देखील आहे.

राज्यातील मंत्रिमंडळात आता २० मंत्री आहेत. त्यापैकी अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा कार्यभार आहे, तसेच एकाच मंत्र्याकडे अनेक खाती त्यासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. या पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळ विस्तारनंतर सर्व कामकाजाचे वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्री पदाची शपथ ही ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर १८ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आले होता.

मात्र या मंत्रिमंडळाचा विस्तार करत अजून २३ जणांना मंत्री म्हणून समावेश करून घेतले जाऊ शकते. शिंदें गटातील ५० आमदारांपैकी फक्त १० जण हे मंत्री आहेत. त्यामुळे संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे आता सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकारवर मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबाव वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Pawna Dam News : पवना धरण परिसरातील अतिक्रमणावर पाटबंधारे विभागाची जोरदार कारवाई!

Pune Municipal Election : मतदारांच्या पळवापळवीने इच्छुकांचे धाबे दणाणले

Ambegaon News : २५०० पशुधनावर एकच दवाखाना; एक्स-रे, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा देणारे ‘तालुका सर्वचिकित्सालय’ रखडले!

SCROLL FOR NEXT