Maharashtra cabinet expansion anytime after July 11 Maharashtra cabinet expansion anytime after July 11
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर कधीही; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सर्वांच्या नजरा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे (cabinet expansion) लागल्या आहेत. ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणाऱ्या सुनावणीनंतर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्व याचिकांवर सुनावणी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे सूत्राने बुधवारी (ता. ६) सांगितले. (Maharashtra cabinet expansion anytime after July 11)

११ जुलैला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या नव्या पक्षाचा व्हिपला मान्यता देण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटानेही आव्हान दिले आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) होणार आहे. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितले होते.

मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी सुरू केली होती आणि पक्षाच्या बहुतांश आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती.

मंत्रिमंडळ वाटपाबाबत चर्चा होण्यापूर्वी त्यांना आणि फडणवीसांना थोडा वेळ लागेल, असे सोमवारी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. आम्हाला नीट श्वास घेऊ द्या. आमच्यासाठी खूप व्यस्त वेळ होता. देवेंद्र फडणवीस आणि मी बसून मंत्रिमंडळ विभाग आणि वाटपावर चर्चा करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

अपात्रतेच्या याचिका प्रलंबित

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ११ जुलै रोजी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १५ बंडखोर आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. त्यांच्याविरुद्ध अपात्रतेच्या याचिका प्रलंबित आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाला विनंती केली होती की मुख्यमंत्र्यांसह १६ खासदारांविरुद्ध अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणीची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT