cbi
cbi sakal
महाराष्ट्र

सीबीआय करणार महाराष्ट्रातील हायप्रोफाइल फसवणुकीचा तपास!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्यूरो) लवकरच महाराष्ट्रातील १२ मोठ्या बँक फसवणूक प्रकरणांची चौकशी सुरू करणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने (state Government) सीबीआयला चौकशीसाठी संमती देण्याचा निर्णय घेतला आहे. या १२ प्रकरणात तब्बल १३ कोटी ४८ लाखांची फसवणूक झाली आहे. यात अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे, हे विशेष...

या प्रकरणांमध्ये जेट एअरवेज लिमिटेडचे माजी प्रवर्तक नरेश व अनिता गोयल यांनी केलेल्या १,९८७ कोटींच्या बँक कर्ज थकबाकीचाही समावेश आहे. जेट एअरवेजला २०१९ मध्ये दिवाळखोरीत टाकले होते. कंपनीकडे सुमारे ४५ हजार कोटींचे दावे मागणारे २१ हजार कर्जदार होते. एसबीआयने नोव्हेंबर २०२१ मध्ये जेट एअरवेजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड प्रकरणात येस बँक लिमिटेडचे ​​माजी सहसंस्थापक राणा कपूर यांनी केलेली १,३५३ कोटींची बँक फसवणुकीची चौकशी (CBI) करू शकते. कपूर आणि अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांची १,७०० कोटींच्या कर्ज फसवणूकप्रकरणी चौकशी सुरू असून, कपूर तुरुंगात आहेत.

IL&FS Energy Development Company Ltd, IL&FS Transportation Networks Ltd आणि IL&FS मेरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडविरुद्ध ९८७ कोटी, ५६९ कोटी आणि ५२९ कोटींच्या तीन वेगवेगळ्या कर्ज फसवणूक प्रकरणांची चौकशी करण्यास एजन्सीला सांगितले होते. एजन्सीने सांगितले की, IL&FS समूहाशी संबंधित तिन्ही प्रकरणांमध्ये येस बँक तक्रारदार आहे. IL&FS मधील आर्थिक अनियमितता सप्टेंबर २०१८ मध्ये उघडकीस आली होती. जेव्हा काही समूह संस्थांनी कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरकारने कंपनीचे बोर्ड हटवले आणि रिझोल्यूशन प्लॅनवर काम करण्यासाठी नवीन व्यवस्थापन नियुक्त केले.

कॉर्पोरेट इस्पात मिश्रा लिमिटेडची उपकंपनी असलेल्या कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडचा समावेश असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियामधील ४,०३७ कोटींच्या कर्ज घोटाळ्याचीही (Bank fraud) चौकशी होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट इस्पात मिश्रा लिमिटेड आणि प्रवर्तक आधीपासूनच पंजाब नॅशनल बँकचे १३६ कोटींचे नुकसान केल्याबद्दल सीबीआयच्या (CBI) चौकशीत आहेत.

अग्रवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होण्याची शक्यता

केंद्रीय एजन्सी आधीच ऐबीजी शिपयार्डच्या २२,८०० कोटींच्या कर्ज थकबाकीची चौकशी करीत आहे. ऐबीजी ग्रुप फर्म वदराज सिमेंट लिमिटेड आणि तिचे प्रवर्तक ऋषी अग्रवाल यांच्याविरुद्ध १,१०७ कोटींच्या कर्ज थकबाकीसाठी पंजाब नॅशनल बँकद्वारे (Bank fraud) एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.

सीबीआय एफआयआर दाखल करणार?

दिवाळखोर ट्रॅव्हल फर्म कॉक्स अँड किंग्ज आणि तिचे प्रवर्तक पीटर व उर्शीला केरकर यांच्याविरुद्ध एसबीआयने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ६२४ कोटींच्या कथित फसवणूकप्रकरणी सीबीआय एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंगचा आरोपी पीटर केरकर सध्या तुरुंगात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT