Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? CM शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी रात्री उशिरा राजधानी नवी दिल्लीत (Delhi) दाखल झाले असून, मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेंचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. आमच्याकडे 12 नव्हे तर 18 खासदार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) आणखी एक मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेंच्या एकदिवसीय दौऱ्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने कोणतेही कारण दिलेले नसून, मंगळवारी रात्री उशिरा ते मुंबईत परतणार असल्याचे सीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi)

दरम्यान, शिंदे दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीदेखील भेट घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एका खासदाराने दिलेल्या माहितीनुसार लोकसभेत किमान 12 खासदार स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत असून, बंडखोर खासदार शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊ शकतात.

३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांचा देशाच्या राजधानीचा हा दुसरा दौरा असेल. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 8 आणि 9 जुलै रोजी नवी दिल्लीला भेट दिली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांची भेट घेतली होती.

महाविकास आघाडी (MVA) सरकारसंबंधीच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी शिंदे दिल्लीत दाखल झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार उपस्थित होते. यात सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, संयम माने, कृपाल तुमाने, भावना गवळी आदींचा समावेश होता. तर, शिंदे यांनी सोमवारी बोलावलेल्या बैठकीला विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, संजय जाधव, ओम राणे निंबाळकर आणि राजन विचार उपस्थित नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT