Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : CM शिंदेंनी राजकरणासह गाजवलं क्रिकेटचं मैदान, केली तुफान फटकेबाजी

एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक चेंडू घालवला सीमापार

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमात हजेरी लावतात. त्या कार्यक्रमात सहभागी होतात. आपल्या भाषणातून तूफान फटकेबाजी देखील करतात. यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांनी मैदानावर तूफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मैदानावरील उत्साह पाहून खेळाडू यांच्यासह चाहत्यांचाही उत्साह वाढल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटकडून काल ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांचा आणि चाहत्यांचा उत्साह वाढवला.

एकनाथ शिंदे यांना यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरले आणि त्यांनी जोरदार बॅटिंग देखील केली. मुख्यमंत्र्यांनी आलेल्या प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर मारला केला. मुख्यमंत्र्यांची ही तुफान फटकेबाजी पाहून खेळाडूंनीही टाळ्या वाजवून शिंदेंचा उत्साह वाढवला.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

इतक्यात एकनाथ शिंदे मंचावर आपल्या भाषणातून विरोधकांवर तूफान फटकेबाजी करत असतात. मैदानावर मात्र शिंदे यांनी आपले छुपे गुण दाखवले आहेत. काल मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकार, षटकारांची आतषबाजी करत मैदान मैं भी हम भी कुछ कम नही हे दाखवून दिलं आहे. साक्षात मुख्यमंत्र्यांनाच तुफान फटकेबाजी करताना पाहून खेळाडूंचाही चांगलाच उत्साह वाढला. एकनाथ शिंदे यांच्या या तुफान फटकेबाजीची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT