Maharashtra CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांनंतर आली जाग! शिंदेंनी अवकाळी पावसाबाबत बोलवली बैठक

रुपेश नामदास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या यात्रेची सांगता झाली. शरयू नदीच्या महाआरतीने शिंदेंच्या या यात्रेचा शेवट झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यात परतले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याला गारपीटीने अक्षरशा झोडपलं आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपीटीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांची जनावरे मृत्यु मुखी पडले आहेत. तसेच हजारो घरांचं नुकसान झालं आहे. मात्र राज्याचे राज्यकर्ते दोन दिवस पर्यटनासाठी बोहर गेले होते.

सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यासाठी दुपारी १ वाजता मंत्री मंडळाची बैठक बोलावली आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत पिकांच्या नुकसानीवर उपाययोजना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

दरम्यान रविवारी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. मंदीरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली होती.

शेडखाली अडकलेल्या लोकांनाचे बचावकार्य रात्री उशीरपर्यंत सुरू होते. या दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर अहमदनगर, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आणि पावसाचं पाणी शिरलं. एक-दोन दिवस उलटले तरी दखील नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. अशातच जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT