महाराष्ट्र बातम्या

दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेशाबाबत संभ्रम कायम; शिक्षणमंत्र्यांनी साधला प्राचार्यांशी संवाद

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यांकन कसे होणार, अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाणार, असे प्रश्न उभे राहिले. त्यावर अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार होऊ लागला. परंतु त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेला नाही. परिणामी दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश कसे होणार, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई आणि अन्य राज्यातील काही शिक्षण मंडळांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल दिला जाईल, असे सांगण्यात आले. हे अंतर्गत मुल्यांकन कसे करायचे आणि दहावीनंतर अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी सातत्याने चर्चा करत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमधील नामांकित महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी गायकवाड यांनी नुकताच संवाद साधला. ऑनलाइनद्वारे झालेल्या बैठकीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डॉ. शामराव कलमाडी कनिष्ठ महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राचर्यांशी झालेल्या चर्चेबाबत गायकवाड यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

प्राचार्यांशी झालेल्या चर्चेतून समोर आलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर एकमत झालेले नाही. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठीही अशीच परीक्षा घेता येईल, असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सूचविले आहे.

दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेशाबाबत या मुद्यांवर झाली चर्चा :

  1. - इयत्ता आठवी आणि नववीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेश द्यावा.

  2. - शाळांद्वारे अंतर्गत मूल्यमापन व्हावे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही व्हावी.

  3. - अकरावीसाठी प्रवेश परीक्षा असावी.

  4. - वर्षभर शाळांमध्ये घेतलेल्या ‘टेस्ट’च्या आधारे मुल्यांकन व्हावे.

  5. - दहावीनंतर अकरावी, आयटीआय आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निश्चित धोरण असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT