COngress sakal
महाराष्ट्र बातम्या

शिर्डीत काँग्रेसचं चिंतन शिबीर; २०-२५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेणार

या शिबिरादरम्यान उदयपूर नवसंकल्प शिबिरातल्या घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठीचं नियोजन केलं जाईल.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर आजपासून शिर्डीत सुरू होत आहे. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. एक आणि दोन जून रोजी होणाऱ्या या शिबिरादरम्यान उदयपूर नवसंकल्प शिबिरातल्या घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठीचं नियोजन केलं जाईल. (Maharashtra Congress Committee)

याबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Congress) म्हणाले की काँग्रेसचं दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर नुकतंच उदयपूरमध्ये पार पडलं. या शिबिरात तयार करण्यात आलेलं घोषणा पत्र राज्यांमध्येही लागू करण्यात आलं आहे. यासाठी राजकीय, संघटनात्मक, अर्थशास्त्रविषयक, कृषी, सामाजिक न्याय आणि युवकांसह महिला सशक्तीकरणाविषयीही चर्चा करण्यासाठी सहा गटांची स्थापना करण्यात आली आहे. हे सहा गट घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठीचा एक रोडमॅप तयार करतील आणि त्यावर चर्चा होईल. त्यानंतर अहवाल सादर केला जाईल.

या शिबिरामध्ये पार्टीचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, सर्व कॅबिनेट मंत्री, पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT