Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Congress: काँग्रेस धमाका करण्याच्या तयारीत? घेतला शरद पवार, उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारा निर्णय

Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्या दहा वर्षांनंतर प्रथमच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्या दहा वर्षांनंतर प्रथमच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात पुढील दोन ते तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढणाची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागविल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी 10 ऑगस्टपर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवण्याची व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली आहे.

दरम्यान काँग्रेस जरी 288 जागा लढण्याची तयारी करत असली तरी शरदचंंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी काँग्रस ही खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

लोकसभेत काँग्रेस सुसाट

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली होती. यावेळी त्यांनी 17 जागा लढवत 13 जगांवर दमदार विजय मिळवला आणि राज्यातील अव्वल पक्ष ठरले. इतकेच नव्हे तर सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 14 वर गेला आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 9 जगा लढवत 8 जगांवर विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: घरखरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सिडको घरांच्या दरात १० टक्के कपात, पण कोणत्या? सरकारचा ऐतिहासिक निर्णय

एका क्षणात बदलेलं आयुष्य... मुंबईतील BMW hit-and-run प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा कठोर निकाल! महिलेला १.५ किलोमीटर फरफटत नेलं होतं

Paithan News : इंदेगाव शिवारातील कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!

Latest Marathi News Live Update: हक्कभंग प्रकरणी चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिफारस

Katraj Lake News : कात्रज तलावातील ३० हजार घनमीटर गाळ काढल्याचा पालिकेचा दावा; नागरिकांतून प्रश्नचिन्ह; भ्रष्टाचार झाल्याचा आरोप!

SCROLL FOR NEXT