Corona Test sakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाचा आलेख वाढताच! सलग दुसऱ्या दिवशी हजारांपार बाधित

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवासांपासून कोरोना (Corona Maharashtra) बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडणाऱ्या राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या झापाट्याने वाढत असून, सलग दुसऱ्या दिवशी राज्यात नव्या वाधित होणाऱ्यांच्या संख्येने हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona Update News)

दरम्यान, कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत एकूण 77,36,792 जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर, मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाच 4,559 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील कोरोनाचे सर्वाधिक 3,324 रूग्ण मुंबईत आहेत. या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये कोरोनाचे 555 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर

दरम्यान, गेल्याकाही दिवसांपासून देशासह राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हणत, वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT