corona update sakal Media
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Corona Update : काळजी घ्या! राज्यात आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण; मुंबईत सर्वाधिक प्रकरणे

देशातील काही राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे

रोहित कणसे

Maharashtra Corona Update : देशातील काही राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात देखील मंगळवारी (१९ डिसेंबर) रोजी कोरोनाच्या नवे ११ रुग्ण आढळले आहेत. यापैकी आठ रुग्ण हे राजधानी मुंबईत आढळले आहेत. आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या कोरोना प्रकरणांची संख्या ३५ आहे. यापैकी २७ रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत २७, पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक सक्रिय रुग्ण आहे. तर होम आयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत. तर एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.

मंगळवारी एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाहीये, आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले ८०,२३,४०७ रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाहीये.

सध्या भारतात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन.१ चा पहिला रुग्ण आठ डिसेंबर रोज केरळमध्ये आढळला होता. यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्राने सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT