covid 19 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रानं चीनला मागं टाकलं; तरीही राज्याला दिलासा देणारी बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 07 : महाराष्ट्रात रविवारी नवीन 3 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 85 हजार 975 इतकी झाली असून एकट्या महाराष्ट्राने कोरोनाचा पहिला रुग्ण ज्या देशात सापडला त्या चीनला मागे टाकलं आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 83 हजार 36 रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात हीच संख्या जवळपास 86 हजार इतकी झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3007 रूग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 91 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृतांची संख्या 3060 वर पोहोचली आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत असली तरी एकूण संसर्ग झालेल्या 85 हजार 975 रुग्णांपैकी 39 हजार 314 जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर 43 हजार 591 अॅक्टिव्ह केसेस राज्यात आहेत. आतापर्यंत राज्यात 5 लाख 51 हजार 647 जणांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण दिलासादायक आहे. याशिवाय चीनमध्ये 83 हजार 36 रुग्णांपैकी 4634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात मृतांचा आकडा कमी आहे. 

महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अजुनही मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी मुंबईत 1421 नवीन रुग्ण आढळले. तर एका दिवसात 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत 48 हजार 549 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातील 21 हजार 196 रुग्ण ठणठणीत झाले आहेत. आता मुंबईत 25 हजार 717 कोरोनाचे रुग्ण असून 1636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत धारावी झोपडपट्टीत कोरोना रुग्णांची संख्या 1912 इतकी झाली आहे. आतापर्यंत धारावीत 71 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 30 पोलिसांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील 5 ते 55 वय असलेल्या पोलिसांना सामान्य ड्युटी आणि 55 वर्षांवरील पोलिसांना सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT