jagran Gondhal
jagran Gondhal sakal
महाराष्ट्र

गौरवास्पद : महाराष्ट्राचा ‘जागरण-गोंधळ’ देशात सर्वप्रथम

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले. विविध राज्यांचे पंधरा संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने जागरण- गोंधळ या लोककला प्रकाराचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स या लोककला समूहाने हा कार्यक्रम सादर केला.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त येथील राजपथावर महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील जैवविविधता व जैव मानके या चित्ररथाचे संचलन होणार आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते. यावर्षी या स्पर्धेत १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या मंत्रालयांनी राज्यांच्या लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. राज्याच्या विजेत्या संघात १४ कलाकारांनी सहभाग घेतला.

राज्याचा चित्ररथ सज्ज

‘महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके’ यावरील राज्याचा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहे. या चित्ररथाचीही तयारी आणि निर्मिती पूर्ण झाली आहे. दरम्यान, राजपथावरील प्रजासत्ताक दिन संचलनात ‘वंदे भारतम नृत्योत्सवा’चे पथक सहभागी होईल. यातही राज्याचे हे कलाकार सहभागी होणार आहेत. विविध राज्यांतील ३६ कलापथकांचाही यावर्षीच्या संचलनात सहभाग असेल.

यातील सुमारे ४६० कलाकारांना मैत्रैयी पहाड़ी, तेजस्विनी साठे, संतोष नायर कथक नृत्यांगना रानी खानम हे नृत्य प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्राच्या विजयी कलाकारांत अमेय पाटील, भावना चौधरी, संजय बलसाने, शिल्पेश तांबे, सुशांत पवार, पारस बारी, हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका, हिमानी दळवी, प्राजक्ता गवळी, तेजस गुरव, विशाखा मोरे, वैदेही मोहिते, निधीशा सॅलियन, किरण जुवळे, अंकिता पाटलेकर यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT