Fort sakal media
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रदिन विशेष : पाहा महाराष्ट्रातील अपरिचीत गडकिल्ले

महाराष्ट्रातील १० अपरिचित किल्ल्यांची थोडक्यात माहिती

दत्ता लवांडे

महाराष्ट्र राज्य हे विविध निसर्गसौंदर्य आणि विविधतेने नटलेला आहे. त्यामध्ये स्वराज्यातील आणि स्वराज्याच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांचा सामावेश आहे. महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत त्यापैकी आपल्याला खूप कमी माहिती आहेत. अशाच अपरिचीत असलेल्या १० किल्ल्यांची माहिती आपण बघूया.

या किल्ल्याला शिवपट्टण चा किल्ला म्हणूनसुद्धा ओळखला जातो. हा किल्ला अहमदनगर जिल्यातील शिर्डी हैद्राबाद महामार्गालगत असणाऱ्या खर्डा गावात आहे. या गावाला मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखलं जातं.
जंजाळा ऊर्फ वैशागड हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. औरंगाबाद-जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गावर जंजाळा हे गाव आहे. अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. जंजाळा हे डोंगरमाथ्यावरचे चिमुकले गाव असले तरी अतिशय सुंदर आहे. येथून चार किलोमीटरवर पायी चालत गेल्यावर वैशागड ऊर्फ जंजाळा लागतो. फोडलेल्या तटातून किल्ल्यात प्रवेश होतो. अफाट विस्तार असलेल्या या किल्ल्यावर उद्ध्वस्त इमारतींचे अनेक अवशेष आहेत. खूप तलाव आहेत, पिण्याचे पाणी आहे. गडावरून लांबवरचा मुलुख न्याहाळता येतो.
कन्हेरगड हा औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा - औट्रम घाट अभयारण्यात चाळीसगाव शहरापासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या पाटणादेवी या परिसरात आहे. समुद्रसपाटीपासून ६६० मीटर या किल्ल्याची आहे.
जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !
तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. तिथे हा किल्ला बांधला गेला आहे. तांदूळवाडी हे गाव सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ किमी अंतरावर वसलेले आहे.
गोंड राजाचा किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या सभोवताली पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते या किल्ल्याचे प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावर फारसी लिपीत कोरलेले आढळून येते. या द्वारातुन सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य द्वार आहे.
कण्हेरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.
हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा किल्ला असून पर्वतगड म्हणूनही याला ओळखलं जातं.
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. १८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील मसुरे गावात हा भरतगड आहे. शिवाजी महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांना मिळाला. तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT