Majhi Kanya Bhagyashree Lek Ladki Yojana esakal
महाराष्ट्र बातम्या

Lek Ladki Yojana : 'लेक लाडकी' आता नव्या स्वरूपात; शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना एक ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू केली होती.

दिलीपकुमार चिंचकर

कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सातारा : मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, याकरिता शासनाने (Maharashtra Government) माझी कन्या भाग्यश्री (Majhi Kanya Bhagyashree Yojana) या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरू केली आहे.

या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. कुटुंबाला एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना एक ऑगस्ट २०१७ मध्ये सुरू केली होती. त्यामध्ये एका मुलींवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्यास ५० हजार रुपये त्या मुलीच्या नावावर केलेल्या २५ हजार रुपयांच्या ठेव पावत्या दिल्या जात होत्या, तसेच दांपत्यास एक मुलगा व मुलगी झाल्यास हा लाभ दिला जात नव्हता. शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणास मदत व्हावी, या हेतूने ही नवीन योजना सुरू केली आहे.

अशी आहे योजना

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. त्याप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना करून राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.

योजनेचे असे आहेत लाभ

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये. मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये. अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जाणार. मुलीस एकूण एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला. कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला.

  • लाभार्थी, पालकांचे आधारकार्ड. बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत. पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड छायांकित प्रत.

  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थींचे मतदार यादीत नाव आवश्यक)

  • संबंधित टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला.

  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

लाभासाठी अटी

ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT